*लसूण*

*लसूण*

1.लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. 

2.लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. 

3.लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. 

4.सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो. 

5.रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे. 

6.थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते. 

7.लसणात अॅण्टी इन्फ्लामेटरी गुण आहेत. ज्यामुळे अॅलर्जीला दूर पळविता येते. लसणातील अॅण्टी आर्थिटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्यायल्यानेही अनेक फायदे आहेत. 

8.लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. 

9.सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते. 

10.लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते. 

11.नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. अॅसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो. 

12.दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. ज्या मुलांना सर्दीचा त्रास जास्त होतो, त्यांना लसणाच्या पाकळ्यांची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.

13.वजन घटविण्यात लसूण गुणकारी आहे. शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.

14.सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लखांब

27 नक्षत्र मंत्र आणि वनस्पती...

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*